Home Maharashtra रायगड आम आदमी पार्टीची खोपोली मध्ये जोरदार वाटचाल

आम आदमी पार्टीची खोपोली मध्ये जोरदार वाटचाल

0
आम आदमी पार्टीची खोपोली मध्ये जोरदार वाटचाल

नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुरू केले जन समस्या निवारण शिबिर

aapkhopolikhalapur.org पक्षाची वेबसाईट लॉन्च
राजेश बाष्टे अलिबाग प्रतिनिधी:-
आम आदमी पार्टीची खोपोली शहरात जोरदार वाटचाल सुरू आहे. मागील आठवड्यात डॉ शेखर जांभळे यांना खालापूर तालुका अध्यक्ष बनवून आम आदमी पार्टीने खोपोली शहरात प्रचारामध्ये आघाडी घेतली असून खूप मोठे व्यक्तिमत्व असलेले डॉ शेखर जांभळे आम आदमी पार्टीमध्ये सामील झाल्याने पार्टीची ताकद दुपटीने वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये एक नवा जोश व उमेद निर्माण झाली आहे. डॉ शेखर जांभळे यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी खोपोली – खालापूरने नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जन समस्या निवारण शिबिर सुरू केले आहे. सदर शिबिराचे बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी डॉ. अल्तमश फैजी कोकण प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून. दररोज सकाळी नऊ ते दहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या समोर झाडाखाली जन समस्या निवारण शिबिर लागणार आहे. सदर कार्यक्रमाला रायगड जिल्हा अध्यक्ष मनोज घरत, रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत शिंदे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सचिव जयसिंग शेरे, रायगड जिल्हा सदस्य राजेंद्र मडवी, रायगड जिल्हा राजेंद्र घाडी व जिल्ह्यातील इतर सदस्य उपस्थित होते.

तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व सदस्यता अभियान चालवण्यासाठी आम आदमी पार्टी खोपोली खालापूर ने aapkhopolikhalapur.org ह्या नावाने आपली वेबसाईट सुरू केली आहे.

ह्या वेबसाईटवर पक्षाने आज पर्यंत केलेल्या कामाचे दैनंदिन अहवाल सादर केले जातील व पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत लोकांना माहिती दिली जाईल असे डॉ रियाज पठाण यांनी सांगितले.

सदर वेबसाईट द्वारे नागरिकांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्याचे आम्ही प्रयत्न करू तसेच नागरिकांच्या काही सूचना असतील तर तेही आम्ही अमलात आणण्याचे प्रयत्न करू असे तालुका अध्यक्ष डॉ शेखर जांभळे यांनी सांगितले.

सदर वेबसाईट द्वारे शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुलभ होणार असून सदस्यता सुद्धा घेता येईल असे शहराध्यक्ष ग्यासुद्दिन खान यांनी सांगितले.

आगामी काळात पार्टी अजून जोमाने कामाला लागणार असून शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवणे हेच आमचे प्राधान्य असणार आहे.

सदर कार्यक्रमासाठी खोपोली खालापूर शहरातील पदाधिकारी ग्यासुद्दिन खान खोपोली शहर अध्यक्ष, शिवा शिवचरण खोपोली शहर उपाध्यक्ष,जहीर अहमद शेख खालापूर तालुका सचिव, कस्तूरचंद राठोड़ खालापुर तालुका उपाध्यक्ष, विवेक वाघमारे शिळफाटा अध्यक्ष,चंद्रप्रकाश उपाध्याय खोपोली शहर सचिव, शाहनवाज सय्यद प्रभाग 13 अध्यक्ष, धर्मेंद्र चव्हाण प्रभाग 8 अध्यक्ष, शादाब सय्यद युवा नेते, शाम देशमुख प्रभाग 8 अध्यक्ष व व्यापारी संघटना अध्यक्ष,प्रभाग क्रमांक 5 चे यशवंत पवार, शहनाज खान, अरिबा शेख आदी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠