Home Politics या ऐतहासिक भूमीचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली :- अदिती तटकरे

या ऐतहासिक भूमीचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली :- अदिती तटकरे

0
या ऐतहासिक भूमीचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली :- अदिती तटकरे


अलिबाग अमुलकुमार जैन
आपण सर्व भाग्यशाली आहोत की आपण या भूमीत जन्माला आलो आहे. त्यामुळे या ऐतहासिक भूमीचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपणा सर्वावर आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अलिबाग येथील सरखेल कान्होजी आंग्रे समाधी स्थळ येथे केले.
यावेळी व्यापीठावर आमदार महेंद्र दळवी, अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रघुजी आंग्रे,पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अदिती तटकरे म्हणाल्या की,मी पर्यटन विभागाची राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याची पालकमंत्री असताना अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रामुख्याने मागणी होती की,या भूमीचे सुशोभीकरण व्हावे. रायगड जिल्ह्यालां ऐतहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि महाराजांची राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड जिल्हा.या जिल्ह्याचे पहिले नाव कुलाबा असे होते. आजही राज्याच्या कानोकोपऱ्यात कार्यक्रमासाठी जात असताना तेथे असणारे पण त्याकाळी रायगड जिल्ह्यात कार्यरत असणारे निवृत्त ज्येष्ठ अधिकारी हे आर्वजून आजही कुलाबा किल्ला आणि त्या परिसराची माहिती विचारात असतात.
सरखेल कान्होजी आंग्रे समाधी स्थळ या भूमीचे सुशोभीकरण करण्यासाठी अलिबाग नगरीचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या समवेत प्रस्तावित बैठक या भूमीत घेतली होती त्यावेळी प्रशांत नाईक यांचा आग्रह होता की या सुशोभीकरणसाठी लागणारा निधी हा एका टप्प्यात मंजूर करण्यात यावा. मात्र त्यावेळी आर्थिक बाब लक्षात घेता दोन टप्प्यात हे काम करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार मी व आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी वैष्टिय पूर्ण निधीतून निधी मंजूर करून घेतला आहे. पहिल्या टप्प्याचे काम सुरू असतानाच दुसऱ्या टप्पासाठी लागणाऱ्या निधीसाठी प्रयत्न करून 2024-2025 या आर्थिक बजेट मध्ये इतकचं निधी मंजूर करून घेण्याची जबाबदारी ही माझी आणि आमदार महेंद्र दळवी यांची आहे.

यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना अदिती तटकरे यानी या सुशोभीकणासाठी दोन कोटीहून अधिक निधी प्राप्त करून दिला होता. माझ्या प्रयत्नाने तीन कोटी असा पाच कोटीचा निधी मंजूर करून दिला आहे.या सुशोभीकरणासाठी शासनाच्या माध्यमातून लागणारा निधि अजूनही उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही आमची आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत असताना अलिबाग नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी सांगितले की,दर्या सारंग सरखेल कान्होजी राजे आंग्रे हे मराठा आरमाराचे प्रमुख होते. त्यांचे कादकिर्दीत त्यांनी केलेले पराक्रम व इतिहास हा तरुण पिढीला व सर्वसामान्य जनतेला अनुभवता यावा व कळावा याकरीता अलिबाग नगरपरिषदेने अलिबाग शहरातील कान्होजी राजे समाधी स्थळाचे सौदर्याकरण करुन विकसित करण्यात येणार आहे.सदर प्रकल्पाअंतर्गत प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२१-२२ अंतर्गत काम नं. १ अलिबाग नगरपरिषद हददीतील दर्या सारंग सरखेल कान्होजी आंग्रे समाधी सुशोभिकरण करणे (टप्पा-१ व २) या कामांस रक्कम रु. ५०.० लक्ष, काम. नं. २- अलिबाग येथिल दर्या सारंग सरखेल कान्होजी आंग्रे समाधी परिसर सुशोभिकरण करणे या कामांस रक्कम रु. १.५३ कोटी त्याच प्रमाणे वैशिष्टयपूर्ण योजनेतून काम नं. ३- दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे समाधी स्थळ सुशोभिकरण उर्वरीत कामे करणे या कामांस रक्कम रु. ३.० कोटी इतका निधी शासनाकडून मंजूर झालेला आहे.सदरचा प्रकल्प हा दोन टप्यांमध्ये राबविण्यांत येणार असून, वरील प्रमाणे प्रस्तावित कामे ही पहिल्या टप्यामध्ये करण्यांत येणार आहेतः
पहिल्या टप्यात सरखेल कान्होजीराजे आंग्रे उद्यानाच्या प्रवेशद्वारावर भव्या गलबत नौकेची प्रतीकृती तयार करणे.
सुरक्षारक्षक भिंतीवर फायबरचे आकर्षक कोरीवकाम करणे, महत्वाच्या किल्ल्यांची प्रतीकृती तयार करणे त्यांचेसमोर कृत्रिम तलावाची निर्मीती करणे. FRP मटेरिअलमध्ये दिपमाळा तयार करणे.सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या जिवनापटावर कलात्मक म्युरल बनविणे.उद्यानाची आकर्षक विद्युत रोषणाई करणे.आवश्यक ठिकाणी सिव्हील व फायब्रेकीशनचे काम करणे.आदी कामे करण्यात येणार आहेत.
सदर सौदर्गीकरण करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यांत येणार असून, अलिबाग येणारे पर्यटक व आजूबाजूचे परिसरातील नागरीक यांचेकरीता पर्यटनाचे दृष्टिकोनातून अलिबाग नगरपरिषदेकडून सरखेल समाधी स्थळ व उद्यान हे पर्यटन आकर्षण केंद्र म्हणून विकसित करण्यांत येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠