Home Maharashtra सुप्रीम कोर्टाला २२ जानेवारीला सुट्टी नाही! ठाकरे गटाच्या याचिकेवर होणार सुनावणी

सुप्रीम कोर्टाला २२ जानेवारीला सुट्टी नाही! ठाकरे गटाच्या याचिकेवर होणार सुनावणी

0
सुप्रीम कोर्टाला २२ जानेवारीला सुट्टी नाही! ठाकरे गटाच्या याचिकेवर होणार सुनावणी

– अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची २२ जानेवारीला प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी केंद्र सरकारनं अनेक राज्यातील सरकारांनी राज्यात हाफडे घोषित केला आहे. तसेच सुप्रीम कोर्टातील बार असोसिएशनकडूनही कोर्टाला पत्र लिहित सुट्टी जाहीर करण्याची विनंती करण्यात आली होती.
पण ही विनंती अमान्य करण्यात आली आहे. त्यामुळं सोमवारी २२ जानेवारी रोजी पूर्ण वेळ सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरु राहणार आहे.
सुप्रीम कोर्टानं सोमवारी २२ जानेवारीला कामकाज पूर्णवेळ सुरु राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंच्या गटाकडून अध्यक्षांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. कोर्ट क्रमांक १ मध्ये सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.
शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. या निकालामुळं एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या १५ आमदारांना दिलासा देण्यात आला. कारण त्यांचा एकही आमदार घटनेतील १० व्या सुचीनुसार अपात्र ठरले नाहीत. तसेच ठाकरे गटाचेही आमदार अपात्र ठरले नाहीत. पण या निकालावर ठाकरे गटानं आक्षेप घेतला असून पक्षात फूट पडली आहे तर कोणीतरी अपात्र व्हायलाच पाहिजेत पण ते न झाल्यानं हा निकाल चुकीचा असल्याचा ठपका ठेवत ठाकरे गटानं नार्वेकरांच्या निकालाविरोधात पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠