Home Maharashtra रेशनकार्डशिवाय मिळणार रेशन

रेशनकार्डशिवाय मिळणार रेशन

0
रेशनकार्डशिवाय मिळणार रेशन

मुंबई :- सरकार अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांना मोफत रेशन देत आहे. म्हणजेच जेवढे शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना सातत्याने मोफत रेशनची सुविधा मिळत गेली. साहजिकच गरीब वर्गाला याचा खूप फायदा झाला. त्याचबरोबर आता सरकार अशा सुविधेवर काम करत आहे, ज्यामध्ये तुम्ही रेशनकार्डशिवाय रेशन घेऊ शकाल. ही सुविधा प्रथम उत्तर प्रदेश आणि नंतर इतर राज्यांमध्ये सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
सरकारने देशात ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ची सुविधा सुरू केली आहे. आता या सुविधेत ७७ कोटी लोक जोडले गेले आहेत. तुम्ही कुठेही राहात असाल तरीही, तुम्हाला फक्त सरकारी दुकानात जाऊन रेशनकार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक सांगावा लागेल आणि तुम्हाला रेशन मिळेल.
याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, ७७ कोटी लोकांपैकी एकूण ९६.८ टक्के शिधापत्रिका वापरणाऱ्यांची संख्या आहे, ज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशांसह ३५ राज्यांतील लोकांचा समावेश आहे. सोबतच त्यांनी सांगितले की, कोणीही व्यक्ती इतर कोणत्याही शहरात किंवा राज्यात नोकरीसाठी गेल्यास रेशनकार्ड क्रमांक आणि आधार कार्डची माहिती देऊन रेशन घेऊ शकतो. तसेच त्याला मूळ शिधापत्रिका दाखवण्याची गरज भासणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠