Home Maharashtra राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांनी रायगडमधील जिल्हा परिषदेच्या पंधरा शाळांना मिळणार आदर्श रूप*

राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांनी रायगडमधील जिल्हा परिषदेच्या पंधरा शाळांना मिळणार आदर्श रूप*

0
राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांनी रायगडमधील जिल्हा परिषदेच्या पंधरा शाळांना मिळणार आदर्श रूप*

राजेश बाष्टे-अलिबाग,दि.28 – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेच्या काही शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. त्यासाठी राज्याच्या शिक्षण व क्रीडा विभागाने ज्या शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करायचे आहे. त्या शाळांसाठी निधी वितरीत केला आहे.
रायगड जिल्ह्यातील पंधरा शाळांचा समावेश आदर्श शाळा म्हणून समावेश करण्यात आला असून यामध्ये अलिबाग तालुक्यातील वाईशेत जि.प.शाळा, कर्जत तालुक्यातील कळंब जि.प.शाळा, खालापूर तालुक्यातील चौक जि.प.शाळा, महाड तालुक्यातील वहूर जि.प.शाळा, माणगाव तालुक्यातील तळाशेत जि.प.शाळा, म्हसळा तालुक्यातील खरसई मराठी प्राथमिक जि.प.शाळा, मजगाव ता.मुरूड मराठी जि.प.शाळा, वावेघर ता.पनवेल जि.प.शाळा, आमटेम ता.पेण जि.प.शाळा, लोहरे ता. पोलादपूर जि.प.शाळा, कोलाड ता.रोहा येथील जि.प.प्राथमिक केंद्रीय शाळा, श्रीवर्धन तालुक्यातील मौजे वडवली येथील मराठी जि.प.मराठी शाळा, वाघोशी ता.सुधागड जि.प.प्राथमिक शाळा, तळा तालुक्यातील वाशी हवेली जि.प.शाळा, उरण तालुक्यातील मोठी जुई येथील जि.प.प्राथमिक शाळा यांचा समावेश आहे.
या प्राप्त निधीतून शाळांमध्ये आवश्यक मोठे बांधकाम करण्यात येणार आहे. यामुळे सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळण्याबरोबर विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करण्यासाठी मदत होणार आहे. या उपलब्ध निधीच्या माध्यमातून शाळांचा दर्जा वाढणार असून विविध स्तरावर या शाळांचा विकास केला जाईल, असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠