Home Politics वाडगाव कुस्‍ती प्रशिक्षण केंद्रात उत्तम मल्ल तयार होवून ते राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय पातळीवर नाव उंचावतील :- सुनील तटकरे

वाडगाव कुस्‍ती प्रशिक्षण केंद्रात उत्तम मल्ल तयार होवून ते राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय पातळीवर नाव उंचावतील :- सुनील तटकरे

0
वाडगाव कुस्‍ती प्रशिक्षण केंद्रात उत्तम मल्ल तयार होवून ते राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय पातळीवर नाव उंचावतील :- सुनील तटकरे


अलिबाग – अमुलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील वाडगाव कुस्तीसाठी प्रसिद्ध गाव आहे. मात्र येथे उभारण्यात येणाऱ्या कुस्‍ती प्रशिक्षण केंद्रात उत्तम मल्ल तयार होवून ते राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय पातळीवर नाव उंचावतील अशी अपेक्षा खासदार सुनील तटकरे यांनी
वाडगाव येथे आयोजित कुस्‍ती प्रशिक्षण केंद्र भूमिपूजन कार्यक्रमात केले.
यावेळी व्यापीठावर आमदार महेंद्र दळवी, सरपंच सारिका पवार,राष्ट्रवादी (अजित पवार गट) अलिबाग विधान सभा अध्यक्ष अमित नाईक,भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, काँग्रेसचे कृष्णा भोपी, आशिष भट, जयेंद्र भगत यांच्यासहित आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुनील तटकरे म्हणाले की, आज वाडगाव येथे विविध कामाचे लोकार्पण तसेच कुस्‍ती प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन संपन्न झाले आहे.वाडगाव हे कुस्तीगीर यांच्यासाठी महत्वाचे केंद्र स्थान आहे.मातीमधला हा खेळ वाढवावा तसेच या मातीत उत्तम उत्तम खेळाडू तयार होवून त्यांनी अलिबाग तालुक्यासहित जिल्ह्याचे नाव देशविदेशात घेवुन जातील अशी आशा व्यक्त करीत असताना तटकरे पुढे म्हणाले की, आमदार महेंद्र दळवी यांनी आता सांगितले की,वाडगाव येथे क्रीडा साठी येथे इनडोअर स्टेडियम असावे . यासाठी आमदार म्हणून तुम्ही पत्र द्या आणि त्यापत्रसोबत माझे पत्र जोडून क्रीडामंत्री बनसोडे यांच्याकडून शंभर टक्के निधी मिळवून घेवु. जिल्हा क्रीडा संकुलची आता दयनीय अवस्था झाली आहे. मी अध्यक्ष असताना त्यासाठी माजी मंत्री दत्ताजी खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला होता. आता त्याचा वापर फक्त निवडणुकीच्या मत मोजणीसाठी केला जात असताना त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. खेलो इंडियाच्या माध्यमातून मोठ्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत. कबड्डीला सुद्धा रायगड जिल्ह्यात मोठा वाव आहे. रायगड मध्ये उत्तम उत्तम खेळाडू आहेत. मात्र त्यांना वाव मिळत नाही अशीही खंत व्यक्त केली. उद्याच्या भवित्यात राजकीय आखाडा रंगणार आहे. यामध्ये आपण विरोधकांना चितपट करू. आणि महाराष्ट्र भव्य दिव्य यश प्राप्त करू. अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. येथे अनेक विकास कामे करणे आहे. ग्राम पंचायत इमारत ही चांगली बांधली आहे मात्र बबनने त्याचे उद्घाटन करू दिले नाही. कारण ग्राम पंचायत कार्यालयाच्या वरती सभागृह आणि कार्यालयासमोर पेव्हर ब्लॉक बसविल्याशिय उद्घाटन करायचे नाही.बबनने या ग्राम पंचायत मध्ये कोट्यवधीचा निधी मंजूर करून घेतला आहे. आता कामाच्या प्रमा मोठ्या रक्कमेच्या देता आल्या नाही म्हणून आमदार आपण वेगळी चूल मांडली. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते म्हणून राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतत्वाखालील भाजप आणि शिदे गटाची सत्ता आली आणि त्या सत्तेत आम्ही अजित पवार यांच्या नेतत्वाखालील सत्तेत सहभागी झालो. आता आपण परत एकाच व्यासपीठावर आलो आहोत.कुस्‍ती म्‍हटले की आठवतो पश्चिम महाराष्‍ट्र, तेथील लाल मातीत रंगणारा कुस्‍तीचा फड, पैलवानांना घडवणारया तालमी. कोकणात कुस्‍तीच्‍या खेळाला फारसे महत्‍व दिसत नाही. असे असले तरी रायगड जिल्‍हयातील काही तालुक्‍यांमध्‍ये कुस्‍तीच्‍या स्‍पर्धा भरवल्‍या जातात. परंतु त्‍यांचे स्‍वरूप छोटेखानी असते. नारळी पौर्णिमेला अलिबाग तालुक्‍यातील मांडवा येथे समुद्राच्‍या वाळूवर रंगणारी कुस्‍ती स्‍पर्धा गेली अनेक वर्षे सुरू आहे. या स्‍पर्धेत राज्‍यस्‍तरावरील पैलवान आणि तालमी सहभागी होत असतात. या शिवाय वेगवेगळे उत्‍सव जत्रा यांच्‍या निमित्‍ताने जिल्‍हयाच्‍या विविध भागात कुस्‍ती स्‍पर्धा होत असतात. खासदार निधीच्या कार्यक्रमात ज्याप्रमाणे तुम्हाला, सहभागी करून घेतले आहे. त्याप्रमाणे तुम्ही सुध्दा आमदार निधीच्या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे असा टोला आमदार महेंद्र दळवी यांना लगावत ते पुढे म्हणाले की तुम्ही सर्वाची नावे घेतली मात्र अमित नाईक यांचे नांव घेतले नाही.
यावेळी आमदार महेंद्र दळवी म्हणाले की,आजचा दिवही कुस्ती क्षेत्रासाठी महत्वाचा आहे.50 लाखाचा निधी दिला
कुस्तीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम जयेंद्र भगत यांनी केले आहे.वाडगाव येथे ही वास्तू उभे राहणे गरजेचे होते.मोठ्या प्रमाणत खासदार निधी देतात ही अभिमान स्पद आहेत. आम्ही तुमच्या सोबत असताना वीस पंचवीस लाख दिले असते आज आम्ही तुमच्या सोबत असती. खेळावर आपली निष्ठा आहे हे सर्वांना माहीत आहेत.वाडगाव येथे कुस्ती प्रशिक्षण केंद्राबरोबरच इनडोअर स्टेडियम ची आवश्यक आहे. त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणे गरजेचे आहे. आता लोकसभेचे वारे वाहू लागले आहेत.तटकरे यांच्याकडून राजकारणातील डावपेच घेवुनच राजकारणात यश प्राप्त केले आहे. लोकसभेचे उमेदवार हे तटकरे हेच आहेत त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही तयारी सुद्धा केली आहे.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते यांनी सांगितले की,या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आम्हला सहभगी होण्याची संधी प्राप्त झाली वाडगाव येथे कुस्तीगीर तयार करण्याची कारखाना आहे अलिबाग तालुक्यातील विवध ठिकाणी आखाडा आहे वाडगाव येथे जयेंद्र भगत यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडला आहे. आपण हा निधी उपलब्ध करून दिला आपली ताकत क्षमता काय हे ओळखून आहोत क्रीडा क्षेत्रात तटकरे यांचे भरीव योगदान आहे.रायगड जिल्ह्याच्या मध्यनाती आपले माध्यमातून होत आहे.कुस्तीच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात कसब आहे. चांगले दालन खुले होईल.त्‍यामुळे कुस्‍ती खेळाला कोकणात आगामी काळात चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
यावेळी प्रास्तविक करताना जयेंद्र भगत म्हणाले की,कोकणात कुस्‍ती या खेळाला क्रीडा प्रकार म्‍हणून महत्‍व मिळाले नाहीच परंतु आजवर राजाश्रय देखील मिळाला नव्‍हता परंतु त्‍याची मुहुर्तमेढ ही खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आता रोवली जात आहे.
नवीन खेळाडूना प्रशिक्षणाची उणीव भासत आहे नवीन पिढीला कुस्‍ती खेळाविषयी तंत्रशुदध माहिती व्‍हावी, योग्‍य मार्गदर्शन व्‍हावे, या खेळाबददल आवड निर्माण व्‍हावी यासाठी गेली अनेक वर्षे त्‍यांचे प्रयत्‍न सुरू आहेत. त्‍यांच्‍या या प्रयत्‍नांना खासदार सुनील तटकरे यांचा सक्रीय पाठींबा मिळाला आहे. कुस्‍ती प्रशिक्षण केंद्रासाठी निधी मिळावा अशी मागणी तटकरे यांच्याकडे केली होती. त्‍यांची मागणी तात्‍काळ मान्‍य करत आपल्‍या खासदार निधीतून व्‍यायामशाळेसाठी ५० लाख रूपयांचा निधी उपलब्‍ध करून दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠