Home Politics आघाडीत बिघडीची ठिणगी ज्या प्रमाणे कर्जतमधून पडली त्याप्रमाणे महायुतीमध्ये बिघाडी होणार ?

आघाडीत बिघडीची ठिणगी ज्या प्रमाणे कर्जतमधून पडली त्याप्रमाणे महायुतीमध्ये बिघाडी होणार ?

0
आघाडीत बिघडीची ठिणगी ज्या प्रमाणे कर्जतमधून पडली त्याप्रमाणे महायुतीमध्ये बिघाडी होणार ?

अलिबाग – अमुलकुमार जैन

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील समुद्रकिनारी असलेल्या जे एस एम कॉलेजच्या मैदानावर रायगड जिल्ह्यातील महायुतीमधील भाजप, शिवसेना, आणि राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षासहित घटक पक्षातील नेते मंडळी सहित कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी कर्जत खालापूर विधान सभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांना बोलू न दिल्याने महायुतीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. सेना आणि दोन्ही काँगेस मध्ये असलेली आघाडीमध्ये वादाची ठिणगी ही कर्जत मधून पडली होती.
शिवसेना, काँग्रेस आय आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी मध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे होते. उध्दव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे ह्या होत्या.
कर्जत येथे सर्व शासकीय कार्यालय एका छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय भवन इमारत मंजूर करण्यात आले होते.त्या कार्यक्रमाचे भमिपूजन सोहळा २७ मे २०२१ रोजी करण्यात आला होता.मात्र त्या प्रशासकीय भवनाच्या भूमिपूजनावरून मोठी खडाजंगी होऊन जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे होते. त्यावेळी आक्रमक झालेले कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आघाडीत बिघाडी झाल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशारा दिला होता. आणि त्यानुसार त्यांनी पालकमंत्री अदिती तटकरे हटाव करीत आघाडीमध्ये मिठाचा टाकत ठिणगी पेवतून दिली होती.
कर्जत हे रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे विविध शासकीय कार्यालये या ठिकाणी आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना शासकीय कामासाठी कर्जतला यावेळी लागते. तर येथील शासकीय कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने नागरिकांना इकडून तिकडे हेलपाटे मारावे लागतात. ब्रिटिशांच्या काळात टेकडीवर वसवलेली कचेरी आजही तिथेच आहे. तेव्हा विविध दाखले, महसुलाची कामे आदींसाठी टेकडी चढून जावे लागते. त्यामुळे हि सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली यावे यासाठी कर्जतमध्ये प्रशासकीय भवन इमारत शासनाकडून आमदार महेंद्र थोरवे यांनी मंजूर करून आणले होते.त्याचे भूमिपूजन कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दि. २७ मे २०२१ रोजी केले होते. त्यावेळी कोव्हिडचा काळ सुरु होता. देशात महामारीचे संकट आहे त्यामुळे हा सोहळा छोटेखानी पद्धतीत आला होता. मात्र जेव्हा हि इमारत उभी राहील तेव्हा हिचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भव्यदिव्य स्वरूपात करण्यात येईल असे प्रतिपादन महेंद्र थोरवे यांनी केले होते.
त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे, उपजिल्हा प्रमुख भाई, रायगड सल्लागार भरत भगत, जिल्हा महिला आघाडी प्रमुख रेखा ठाकरे, कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भोर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजयकुमार सर्वगोड, नगरसेवक नितीन सावंत, संकेत भासे, विवेक दांडेकर, राहुल डाळिंबकर, संचिता पाटील, स्वामींनी मांजरे, विधानसभा संघटक संतोष भोईर, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, रायगड सराफ असोसिएशनचे मोहन ओसवाल, शहरप्रमुख भालचंद्र जोशी, शिवराम बदे, प्रदीप ठाकरे, राहुल विशे आदी उपस्थित होते.

प्रशासकीय भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते होणार होते. मात्र त्यापूर्वीच माजी आमदार व तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी प्रशासकीय भवनाचे प्रतीकात्मक भूमिपूजन केले होते. कर्जत येथील प्रशासकीय भवनासाठी आम्ही शासनाकडे प्रयत्न करून अर्थसंकल्पात त्याला मंजुरी मिळविली होती आणि त्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याला पालकमंत्री, महसूलमंत्री यांना डावलून जर भूमिपूजन केले जाणार असेल असेल तर अशी हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. यापुढे त्या हुकूमशाहीला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा सुरेश लाड यांनी शिवसेनेला दिला तर अर्थसंकल्पात मंजूर झालेला निधी हा स्वतःची मालमत्ता आहे काय ? असा सवाल करत शासनाच्या निधीमधून होणारी विकास कामे स्वतःच्या नावावर आणि पक्षाचे लेबल खपवून घेण्याचे प्रकार यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही, असा इशारा तत्कालीन जिल्हाध्यक्ष लाड यांनी दिला होता. आमदार म्हणून तुम्हाला शासनाने अधिकार दिले आहेत, पण आमदार म्हणून कोणतीही कर्तव्ये त्यांना माहिती नाहीत ! हम करे सो कायदा याप्रमाणे स्वतःच्या मनाला वाटेल अशी पत्रिका बनवायला लावली. मात्र या कामासाठी निधी मंजूर करणारे शासनाचे महसूलमंत्री, अर्थमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना न बोलवता आपल्याच हस्ते भूमिपूजन झाले पाहिजे ? हा अट्टाहास केला जाणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस जशास तसे उत्तर देईल, असा इशारा लाड यांनी त्यावेळी दिला होता.
ज्यांना चुकीच्या पद्धतीचे राजकारण सुचले आहे. त्यांना त्यापद्धतीने राजकारण करू द्या. त्यांना पराभव पचनी पडलेला नाही. जनतेने यांना १५ वर्ष संधी दिली मात्र तेव्हा यांना विकासकामे सुचली नाहीत. या अगोदर नुसते पत्र देण्याचे काम झाले. विकासकामे करण्यासाठी संयम ठेऊन वागत आलो आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने कुणी दादागिरी करत असेल तर दादागिरी खपवून घेतली जाणार नाही माझ्यातला शिवसैनिक अजून जिवंत आहे हे लक्षात ठेवावं. असे म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी आक्रमक होत माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर निशाणा साधला होता. लोकांनी मला आमदार म्हणून निवडून दिल आहे. मात्र त्यांना त्याच्या विसर पडला आहे. म्हणूनच मीच आमदार आहे अश्या अविर्भावात येउन त्यांनी इथे भूमिपूजन केलं. मात्र एक सांगतो तुम्ही जे राजकारण चळवळ आहे ते थांबवा अन्यथा आघाडीत बिघाडी झाल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यावेळी देत आघाडीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला.
खोपोली येथे कोविड रुग्णालय सुरु व्हावे यासाठी मी ५० लाख रुपयांचा निधी दिला होता. खोपोली खालापूरसाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उभारले जाणार होते. या रुग्णालयाला अनेक लोकांनी विरोध केला. मात्र तरीही य ४ दिवसात खोपोली येथे कोविड रुग्णलयाचे उदघाटन आमदार थोरवे यांनी केले होते. त्यासाठी तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ५ व्हेंटिलेटर दिले आहेत. परंतु यात एक मांजर आडवी गेली आहे. पण वेळ आल्यावर त्या मांजरीला वेळ आल्यावर उत्तर देऊ असे देखील विधान आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यावेळी केले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आघाडी धर्माचे पालन करत आलेलो होते म्हणून अजून गप्प असल्याचे सांगत प्रत्येक विकासकामात खोडा घालायचा असे पालकमंत्र्यांनी बहुधा ठरवले आहे. असे वक्तव्य त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी केले होते.माजी आमदार तथा तत्कालीन जिल्हा अध्यक्ष हे पाठीशी घालत प्रशासकीय अधिकारी यांच्यावर दबाव आणायचा असे प्रकार सुरु केले आहे. काळी काही अधिकार्यांना फोन करण्यात आले तुम्ही कार्यक्रमाला जाऊ नका तुम्हाला निलंबित करण्यात येईल अशी दादागिरी केली जाते. पण यापुढे हि दादागिरी खपवून घेतली जाणार नाही अशा इशारा त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यानी दिला होता.. आघाडीचा धर्म आम्ही पाळत आहोत मात्र ते आघाडीचा धर्म पाळत नाहीत तेव्हा हे असच सुरु राहील तर आजच त्याच असलेल पालकमंत्री पद उद्या नसेल ! अशा आक्रमक शब्दात आमदार थोरवे यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांना इशारा दिला होता.
अलिबाग येथे झालेल्या मेळाव्यात आमदार महेंद्र थोरवे यांना बोलू न दिल्यामुळे ते नाराज होत व्यासपीठावरून खाली जाण्यासाठी उभे राहिले असता आमदार भरत गोगावले यांनी थोरवे यांचा हात पकडुन खाली बसविले होते.महा युती मेळावा संपल्यानंतर त्यांनी तिळगुळ घेण्याचे नाकारले होते.
रायगड जिल्ह्यात महायुतीचा मेळावा हा प्रथमच होत असताना व्यासपीठावर असणाऱ्या महायुतीमधील भाजपचे प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, भरत गोगावले यांना त्यांचे म्हणे मांडण्यासाठी वेळ दिला. मीही एक आमदार असताना त्यांनी महायुती मेळाव्याचे आयोजक यांनी डावलणे हे चुकीचे आहे.
आज महायुतीच्या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, प्रशांत ठाकूर, रविंद्र पाटील, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, भरत गोगावले यांच्यासहित भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा उमा मुंढे यांना बोलण्याची संधी दिली गेली हे कित पर्यंत योग्य आहे.:-आमदार महेंद्र थोरवे. कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠