Home Maharashtra रायगड अलिबाग प्रेस असोसिएशनने केली पोलिस संघावर सात धावांनी मात<br>सामनावीर ठरला अविनाश घाडगे

अलिबाग प्रेस असोसिएशनने केली पोलिस संघावर सात धावांनी मात
सामनावीर ठरला अविनाश घाडगे

0
अलिबाग प्रेस असोसिएशनने केली पोलिस संघावर सात धावांनी मात<br>सामनावीर ठरला अविनाश घाडगे

रायगड जिल्ह्यातील अलिबाग क्रीडा भुवन येथे
शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्यात अलिबाग प्रेस असोसिएशनने पोलिस संघावर सात धावांनी मात केली आहे. या सामन्याचा सामनावीर अविनाश घाडगे ठरला आहे.
अलिबाग येथील क्रीडा भुवन येथे रायगड जिल्ह्यातील अलिबाग क्रीडा भुवन येथे
शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटनीय सामना हा अलिबाग प्रेस असोसिशन आणि पोलिस संघ यांच्या मध्ये तीन षटकाचा खेळविण्यात आला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर अलिबाग प्रेस असोसिशनकडून प्रथम फलंदाजी घेण्यात आली.
अलिबाग संघाकडून राजन वेलकर व आविनाश घाडगे यांची जोडी फलंदाजी करण्यासाठी मैदानात दाखल झाली.
या जोडीने नाबाद राहत पोलिस संघाला 36 धावांचे आव्हान दिले. मात्र पोलिस संघाकडून हे आव्हान पेलवत असताना पोलिस संघाने षटकात तीन दोन गडी बाद आणि 29 धावांपर्यंत मजल दिली. यावेळी अलिबाग संघाकडून अध्यक्ष प्रकाश सोनावडेकर, प्रमोद जाधव,व सुयोग आंग्रे यांनी गोलंदाजी केली. सदर सामन्यात माजी अध्यक्ष रमेश कांबळे यांनी पोलिस संघाचा फलंदाज मगर याचा उत्कृष्ट झेल टिपला.
या सामन्याचे मालिकावीर अविनाश घाडगे हे ठरले. त्यांना आयोजकांकडून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच विजेता संघ अलिबाग प्रेस असोसिशनला चषक देवून गौरविण्यात आले.
यावेळी विजयी संघाचे अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी जिल्हा परिषदचे सभापती आस्वाद पाटील,माजी नगराध्यक्षा मानसी म्हात्रे, माजी गट नेते प्रदीप नाईक, माजी नगरसेवक अनिल चोपडा, पिंट्या ठाकूर आदी सहीत इतर मान्यवरांनी अभिनंदन केलें.

या स्पर्धेत मल्हार वॉरिअर्स अलिबाग, त्रिश्राव्या 11 वरसोली, धर्मवीर ग्रुप दिघोडी, आझाद 11 कुरुळ, एसपी सुपर प्लेअर्स आंबेपूर, आद्य सप्लायर्स म्हात्रोळी, हार्दीक वॉरिअर्स भोनंग, एम.डी. वॉरिअर्स थळ,सिया वॉरिअर्स नागाव, सरपंच पिंट्या गायकवाड मित्र मंडळ चोंढी, कुबेर 11 अलिबाग, अक्षया हॉटेल 11 अलिबाग, एस.पी. भार्गवी 11 अलिबाग, सिध्दी कन्स्ट्रक्शन कुरुळ, मी हाय कोळी रिसॉर्ट नागाव, आर.सी. ग्रुप अलिबाग या 16 संघांचा सहभाग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠