Home Maharashtra रायगड कोळघर येथे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानाचे आयोजन.

कोळघर येथे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानाचे आयोजन.

0
कोळघर येथे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानाचे आयोजन.

पोयनाड प्रतिनिधी- अलिबाग तालुक्यातील कोळघर येथे काल प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानाचे आयोजन मंडळ अधिकारी कार्यालय पोयनाड तर्फे करण्यात आले होते,देशातील आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता मा.प्रधानमंत्री जनमन या योजनेच्या अंमलबजावणी बाबत मा.जिल्हाधिकारी रायगड भा.प्र.से. श्री.योगेश म्हसे,मा.उपविभागीय अधिकारी अलिबाग श्री.मुकेश चव्हाण व मा. तहसिलदार अलिबाग श्री.विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शना खाली काल दिनांक ०८/०१/२०२४ रोजी मौजे कोळघर आदिवासीवाडी ता.अलिबाग येथे प्रभारी मंडळ अधिकारी चरी श्री.महेश निकम तसेच तलाठी ताडवागळे श्रीम. हेमांगी धोद्डे, व इतर मंडळातील तलाठी व कर्मचारी यांनी मेळावा आयोजित करून शासकीय दाखले उदा. आधारकार्ड, उत्पन दाखला, वयअधिवास दाखला, जातीचा दाखला, ७/१२ उतारा वाटप व इतर शासकीय दाखले वाटप करण्यात आले.
सादर कार्यक्रमात ४७ अधिवासी बांधवाना लाभ देण्यात असून तसेच पुढील काही दिवसात मंडळ चरी व पोयनाड येथील आदिवासी वाड्यानवर सदर मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत, सदरच्या मेळाव्या मार्फत आदिवासी समाजास जास्तीत जास्त लाभ देण्याचा संकल्प आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠