Home Maharashtra रायगड इमेज कॅलेंडर मानचिन्ह ठरले<br /> प्रदीप नाईक यांचे गौरवोद्गार

इमेज कॅलेंडर मानचिन्ह ठरले
 प्रदीप नाईक यांचे गौरवोद्गार

0
इमेज कॅलेंडर मानचिन्ह ठरले<br /> प्रदीप नाईक यांचे गौरवोद्गार


 अलिबाग ।  प्रतिनिधी । तुषार थळे
कोणताही उपक्रमाची सुरुवात करणे सोपे आहे, मात्र त्याचे सातत्य राखणे कठीण आहे. त्यासाठी परिश्रमाची गरज आहे. मैत्रीचे प्रतिक असलेले कॅलेंडर आज घराघरात पोहचले आहे. पर्यटन स्थळांसह सण उत्सवाची माहिती चित्रांद्वारे  कॅलेंडरच्या रुपात पहावयास मिळत आहेत. त्यामुळे हे कॅलेंडर एक मानचिन्ह ठरले आहे, असे गौरवोद्गार  रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी बुधवारी काढले.
कुरुळ येथील श्री कृष्ण सावरकर सभागृहात
इमेज   कॅलेडरच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, सहयोग नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन योगेश मगर, जयहिंद लोकचळवळीचे  कोकण समन्वयक अ‍ॅड. प्रथमेश पाटील,मंदार गडकरी ,दीपिका झेंडे  आदी मान्यवरांसह छायाचित्रकार, व नागरिक उपस्थित होते.  यावेळी प्रदिप नाईक म्हणाले, रमेश कांबळे, जितेंद्र शिगवण आणि समीर मालोदे या तीन छायाचित्रकारांनी एकत्र येऊन इमेज कॅलेंडरची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांसह येथील सण उत्सवाची ओळख कॅलेंडरच्या माध्यमातून घराघरात पोहचावी यासाठी  हा उपक्रम हाती घेतला आहे. छायाचित्रकारांसह चित्र काढण्याचे ज्यांना छंद आहे, अशा सर्वसामान्यांना देखील यामध्ये स्थान देण्याचे काम केले आहे. सामाजिक बांधिलकीतून राबविलेला हा उपक्रम समाजाच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. इमेज कॅलेंडरमध्ये सहभाग घेतलेल्या काही छायाचित्रांचे प्रदर्शन अलिबाग फेस्टीवलद्वारे भरविल्यास अलिबाग, विशेष करून रायगड जिल्ह्यातील  पर्यटन स्थळ, व संस्कृतीची माहिती अधिक घराघरापर्यंत पोहचेल असे प्रदीप नाईक यांनी सांगितले.

यावेळी  द्वारकानाथ नाईक,योगेश मगर यांनीदेखील मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर मालोदे यांनी तर सुत्रसंचलन सुयोग आंग्रे यांनी केले.

बारा छायाचित्रकारांचा सन्मान
समीर भायदे, विकास पाटील, अमेय नाझरे, तुषार थळे, अतूल झेंडे,  निलेश दुदम, पौर्णिमा रोकडे, अमोल नाईक, आकाश थळे, महेश मुसळे,  अतुल वर्तक, अंजली ठोकळ यांच्या छायाचित्रांची निवड इमेज कॅलेंडरमध्ये करण्यात आली आहे. या बारा छायाचित्रकारांचासन्मान माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

इमेज कलेंडरच्या सहाव्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक , माजी गटनेता प्रदीप नाईक , माजी जिल्हा परिषद सदस्य द्वारकानाथ नाईक , काँग्रेसचे नेते योगेश मगर , ऍड .प्रथमेश पाटील , रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समीर भायदे, सामाजिक कार्यकर्ते दर्शन म्हात्रे , दीपिका झेंडे ,  इमेज कॅलेंडरचे संस्थापक जितेंद्र शिगवण , समीर मालोदे  , ज्येष्ठ चित्रकार नाना नाटेकर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠