Home Sport झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धा, स्तुती विठलांनीचे पाच बळी.किक-फ्लिक क्रिकेट अकॅडमी खोपोली विजयी.

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धा, स्तुती विठलांनीचे पाच बळी.किक-फ्लिक क्रिकेट अकॅडमी खोपोली विजयी.

0
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धा, स्तुती विठलांनीचे पाच बळी.किक-फ्लिक क्रिकेट अकॅडमी खोपोली विजयी.


क्रीडा प्रतिनिधी- झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै.मिलिंद चवरकर स्मृतीचषक ४० षटकांच्या एकदिवसीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यात किक-फ्लिक क्रिकेट अकॅडमी खोपोली संघांनी भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरण संघावर विजय मिळवला आहे.
प्रथम फलंदाजी स्विकारत भेंडखळ संघांनी ३३ षटकांन मध्ये सर्व गडी गमावत १३७ धावा धावफलकावर नोंदवल्या,सलामीला आलेला फलंदाज गौरव म्हात्रे यांनी १९ तर अरुष ठाकूर यांनी २० धावा काढल्या.खोपोली संघाकडून फिरकी गोलंदाज स्तुती विठलांनीने सुरेख गोलंदाजी करत ५ फलंदाज बाद केले तर दुसऱ्या बाजूने वैभवी कुलकर्णी,श्रीयुष चव्हाण,गीतांजली शर्मा यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले.प्रतिउत्तर देतांना खोपोली संघाचे सलामीचे फलंदाज नैतिक कारिया यांनी ३२ तर श्रीयुष चव्हाण यांनी सर्वाधिक ६२ धावा काढल्या,भेंडखळ संघाकडून गौरव म्हात्रे आणि आदित्य नाईक यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.सामनावीर म्हणून ५ बळी घेणाऱ्या स्तुती विठलांनी,स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू आरुष ठाकूर,इमर्जिंग प्लेयर श्रीयुष चव्हाण,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गौरव म्हात्रे यांना झुंझारचे सचिव किशोर तावडे,महाराष्ट्र राज्य विद्युत प्राधिकरण पोयनाड शाखेचे कर्मचारी शिवाजी ठोंबे,पायल दबडे,झुंझारचे सदस्य अजय टेमकर,अँड. पंकज पंडित,संदीप जोशी,उमाशंकर सरकार,प्रशांत म्हात्रे, आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠