Home Crime बेजबाबदार ट्रेलर चालकाची तीन वाहनांना धडक

बेजबाबदार ट्रेलर चालकाची तीन वाहनांना धडक

0
बेजबाबदार ट्रेलर चालकाची तीन वाहनांना धडक

उरण प्रतिनिधी: उरण-जेएनपीटी-द्रोनागिरी नोड त्याचबरोबर चिरनेर-दिघोडे-वेश्वी-रस्त्यांवर अपघातांची मालिका सुरूच आहे. अनेक लोकांचे जीव या अपघातात जातात. उरण तालुक्यातील दिघोडे- वेश्वी रस्त्यादरम्यान एका बेजबाबदार ट्रेलर चालकाने तीन वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला.

मागील आठवड्यात द्रोनागिरी नोडमध्ये वशेनी येथील युवकाचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील रस्त्यांवर ट्रेलरच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा उरण तालुक्यातील दिघोडे- वेश्वी रस्त्यादरम्यान एका बेजबाबदार ट्रेलर चालकाने तीन वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला. या अपघातात दोन दुचाकीवरील चालकांनी समयसूचकता दाखवून वाहनावरून उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. याच वाहतूक कोंडीमुळे एका गर्भवती महिलेची प्रसूती ही रस्त्यातच झाली.

या घटनेचे प्रचंड प्रमाणात पडसाद उमटून संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले आणि त्यांनी वाहतूक बंद केली.  यावेळी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.  त्यामुळे अनेकांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला.  यावेळी स्थानिकानीं आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠