Home Crime रेवदंडा पोलिसांच्या तत्परतेने पत्नीची हत्या करणारा आरोपी काही तासांत पोलिसांच्या ताब्यात

रेवदंडा पोलिसांच्या तत्परतेने पत्नीची हत्या करणारा आरोपी काही तासांत पोलिसांच्या ताब्यात

0
रेवदंडा पोलिसांच्या तत्परतेने पत्नीची हत्या करणारा आरोपी काही तासांत पोलिसांच्या ताब्यात

अलिबाग:-अमूलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील भोमोली येथे पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आली असून आरोपीच्या रेवदंडा पोलिसांनी काही तासातच मुसक्या आवळल्या आहेत.याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात मयत यांचा भाऊ परेश जाणू शिद, वय 24 वर्षे,व्यवसाय मोलमजुरी,(राहणार-सागवाडी बेलोशी, पोस्ट-मल्याण) याने रेवदंडा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे ,अलिबाग तालुक्यातील वावे विभागात असणाऱ्या भोमोली येथे दिनांक १५नोव्हेंबर२०२२रोजी पहाटे दोन च्या सुमारास मयत ह्याराहत्या घराच्या हॉलमध्ये झोपलेली असताना यांतील आरोपी तिचा पत्ती रमाकांत चाया मेंगाळ हा घराचे पाठिमागील उघडया दरवाज्याने येवुन त्याने तिचे डावे खांदयाचे मानेच्या खाली छातीवर व डावे दंडावर धारधार चाकुने वार करून तिला गंभीर दुखापत करून जिवे ठार मारले आहे.याबाबत ची तक्रार मयत यांचा भाऊ याने रेवदंडा पोलीस ठाण्यात दिली होती.
रेवदंडा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली .पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे ,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या पथकाने श्वान पथक यांस पाचारण करीत आरोपी यांचा सर्वत्र शोध घेतला तसेच गुप्त माहिती काढून सदर आरोपी हा गोठवडे परिसरातील जंगलभागात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथक हे त्या जंगलभागात जाऊन त्याचा कसून शोध घेतला असता आरोपी हा एका ठिकाणी लपून बसलेला आढळून आला.पोलिसांनी त्याला ताब्यात घेत रेवदंडा पोलीस ठाणे येथे आणले आहे.
याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे हे करीत आहेत.

सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक देविदास मुपड़े यांच्यासाहित,पोलीस उप निरीक्षक शिवकुमार नंदगावे
पोलीस हवालदार अशोक पाटील,पोलीस हवालदार चेरकर कोलाड़ पोस्टे ,पोलीस नाईक राकेश मेहेतर,पोलीस नाईक सचिन वाघमारे,श्वान पथकाचे अंमलदार पोलीस नाईक ,अक्षय पाटील सायबर
ऑस्कर श्वान,पोलीस हवालदार एम. बी. निगड़े , एस. एन. चोगले आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠